CHILD OF MOTHER ( translation) 93-109
CHILD OF MOTHER
( translation) 93-109
NIRVIKALP SAMADHI / निर्विकल्प
समाधी
93
Beyond the realm of thought
Is existence Knowledge Bliss Absolute
Transcending the domain of duality
Is Truth, Knowledge and Infinity.
थांबतात जेथे विचार, मनाचे संपते मनपण
राहते तेथेच ज्ञान आणि मिळतो आत्मानंद
विरून जातो जेथे जीवाचा द्वैतभाव
राहते तेथेच चिरंतन सत्य, ज्ञान
आणि विश्वात्मक भाव
93
A1
The Bliss of Brahmn is the Goal
From sorrows free is the soul
Misery and confusion come to an end
Thereafter, to no one, you need bend
आत्मानंद हेच आहे अंतिम लक्ष्य
येथे आत्मा असतो सर्व दुःखातून मुक्त
मिटतो सारा संभ्रम आणि दुःखामधे ससेहोलपट
जेथे द्वैतच जाते लया तेथे नसतोच कोणी सेव्य आणि सेवक
93
A 2
Joy is the production of good action
Bad action leads to sorrow.
Having tasted the bliss of Brahman
You do not worry about the morrow.
सत्कृत्यातूनच निर्माण होतो खरा आनंद
दुष्कर्म ठरते शेवटी दुःखद; माजविते वादंग
घेता एकदा ब्रह्मसुखाची अनुभूती
चिंताच नाही उरत मग उद्याची.
93
A 3
Absolute joy is the bliss of Brahman
The bliss of knowledge comes from science
Physical bliss is derived from action
Misery is caused by nescience
ब्रह्मज्ञानानेच होतो लाभ आत्मानंदाचा
लाभते ज्ञानाचे वरदान करता अभ्यास शास्त्रांचा
कर्म करता योग्य रिती; होतो लाभ शारिरीक आनंदाचा
विपत्ती आणि दुर्दशा हा परिणाम आहे अज्ञानाचा
93
A 4
You see your face in the mirror
You are here, but the reflection does vanish
Brahman is You, mind is the mirror
Helpless, the mind you cannot banish
बघता डोकावून दर्पणी; प्रतिबिंबित होते मुखकमल
काढून घेता दर्पण; तुम्ही राहता तसेच; प्रतिबिंब पावते विलय
तुम्हीच आहाता ब्रह्म आणि मनच तुमचा आरसा
दीन असहाय्य असते मन; तुम्ही मात्र अनंत अविनाशी आत्मा.
93 A 5
He who hears a hymn
His mind takes that shape
The hymn is revealed to him
As if shown in a map
जो ऐकतो परमेश्वराची स्तोत्रे स्तुती
मनही होते त्याचे व्यापक जसे लवण पडावे सागरी
भजनातूनच परमेश्वराच्या उलगडत जाते आत्मस्वरूप
पसरता नकाशा नजरेसमोर जसे सापडावे गन्तव्य `पूर'
93 A 6
The reflection of Consciousness is your "I"
Knowing this, you need not sigh
That "I" enables the mind to know
Its own trumpet the mind is unable to blow
तुमचे मनन चिंतन अर्न्तमनच आहे तुमचा दृष्टीकोन
उमजले हे की दुःखाचे निःश्वासही होतील फोल
तेच मनन चिंतन तोच मी करेल मदत जाणून घ्यायला
विवेकाचं प्रतिबिंब म्हणजेच आहे माझ्यातला `मी'
झालं का एकदा हे आकलन की दुःखाचे कामच नाही
मदत करतो जाणून घेण्यास मनालाही
तो `मी'
93
A 7
Sound, touch, vision, taste, smell
By the mind these are perceived well
Consciousness has its Reflection
Which thinks that he has position.
He identifies himself with the body.
But he himself is Mr. Nobody.
ध्वनी, स्पर्श, दृष्टी, रुची, वास
होतो बोध त्यांचा मनाने खास
मनात पडलेलं देहबुद्धीचं प्रतिबिंब
सांगते स्वतःची स्वतंत्र ओळख
`हा देह म्हणजेच मी' असे बसतो
तो बरळत
प्रत्यक्षात तो म्हणजे `श्रीयुत
कोणी नाही' हेच असते सत्य.
93
A 8
In dream, he becomes the king
His followers dance and sing
He is able to fly without a wing
In reality, there is nothing he can bring.
स्वप्नामधेच तो होतो मोठा भूपती
अनुयायी त्याचे करती नृत्य स्तुती
असते पंखाशिवायच त्याला आकाशात गती
प्रत्यक्षात मात्र त्याला काहीच साधत नाही.
93 A 9
In dreamless sleep the senses do not perceive
Mind is not in a position to function
He fails to exert and receive
Empty is the body-mind junction
सुषुप्तीत नाही होत इंद्रियांना
काही संवेदना अथवा बोध
मनही असते संपूर्ण संवेदनाशून्य
अबोध
तो होतो क्रियाशून्य आणि अनुभवशून्य
शरीर आणि मनाचा कप्पा/ सांधा राहतो पूर्ण रिता आणि शून्य.
93
A 10
Consciousness is one and the same
Its reflection has some name
He drinks and eats with different plates
Consciousness is the same in all the three states.
असते कायम एकसारखीच जाणीव विवेकाची
त्याच्या प्रतिबिंबाला आहे नाव एक काही
जशी वेगवेगळ्या ताटात अन्नाची चव राहते एकसारखीच
तसाच कुठल्याही स्थितीत विवेकात विकल्प उपजत नाही किंचित
93
A 11
This Consciousness is Atman the Self
It exists without help by itself
It is the only object of love
All love It, may be a king or a dove
आहे हा विवेकच आत्मा सर्वव्यापी
नसत त्याचं अस्तित्त्व कोणाच्याच हाती
असतो विशुद्ध प्रेमस्वरूप हा आत्मा
असो हंस अथवा राजा सगळ्यांनाच तो हवाहवासा
93
A 12
The self is Existence-Consciousness-Bliss
This point we should never miss
Brahman, the Supreme is the same
The difference is only the name
जीव आहे ह्या आत्म्याचेच एक दृश्य प्रतिक
चालणार नाही हे विसरून, नका होऊ चकित
ब्रह्म आहे सर्वोच्च एकच सत्य अंतिम
जरी आहेत नावे त्याची ढीगभर कितीक.
93
A 13
Brahman is the ear of the ear
He who knows this has no fear
He is the mind of mind
In him bliss you will find
He is the eye of eye
Know this, you need not sigh.
ब्रह्म म्हणजे कानांचेही कान
कळले हे ज्याला, नाहीच त्याच्या मनात भयाला स्थान
तोच आहे मनाचेही सूक्ष्म मन
आणि तोच होतो खरोखरीचे वरदान
तोच होतो नेत्रांचेही नेत्र
मग कुठले दुःखाचे उसासे; तो तर जगन्मित्र.
93
A 14
Different is Brahma from the known
Definitely the unknown is not known
Like a bulb fused
Men are confused
जे जे आहे माहित आणि जे जे आहे दृश्य
वेगळे आहे त्याच्यापासून हे सर्वव्यापी ब्रह्म
नाही कळत ब्रह्म गात्रांनाही ; आहे ते अगोचर
जे आहे जाणून घेण्याच्या पलिकडे, व्हावे कसे ते गोचर?
जणु विजेचा दिवाच गेला आहे जळून
तसा झाला आहे माणूस सुन्न आणि गेला आहे गोंधळून
93
A 15
Speech is the vehicle of expression
Unable it to describe Brahman
Brahman is not that people imagine
You see, they are aiming to have bargain
विचारांच्या अभिव्यक्तीसाठी वाणीचे वाहन असते समर्थ
पण ब्रह्माची व्याख्या सांगण्यासाठी ठरते ती असमर्थ
लोकांच्या विचारशक्तीच्या पलिकडे आहे ब्रह्म
मग करतात ते सौदा ठेऊन कशावर तरी लक्ष्य
93
A 16
Mind is an instrument of perception
Unable is to reach Brahman
Eyes have the power of vision
Vision of Brahman is not their mission
Ears enable us to hear
To them Brahman is not near
Vital force enables man to live
When he dies, he is not able to give
Brahman is not which people imagine
You see, they are aiming to have bargain.
मन आहे फक्त साधन, जग जाणून घेण्यासाठी
ब्रह्मापर्यंत पोचायची नाहीच त्याच्यात कुवत मोठी
आहे नेत्रांमधे सामर्थ्य पाहण्यासाठी दृश्य
पण ब्रह्म पाहण्याची दृष्टी हे नाहीच त्यांचे लक्ष्य/ उद्देश्य
ऐकण्यासाठी कान नेहमीच आहेत तत्पर
पण दूर दूर दूर आहे ब्रह्म;
मिळत नाही ते सत्वर
93
A 17
Admission of ignorance of Brahman is nice
He who sincerely admits it is really wise
Claming the knowledge of Brahman , there are guys
They do not accept others' valuable advice
चांगले असते मान्य केलेले प्रांजळपणे ब्रह्मज्ञानाबद्दलचे अज्ञान
तो माणूस नसतोच सामान्य जो व्यक्त करतो अज्ञान
छातीठोकपणे करतात कुणी ब्रह्म पाहिल्याचे दावे
लोकांच्या उपदेशाचेही असते त्यांना वावडे.
93
A 18
From where have we come?
What is the real sum?
For the universe, who is the cause?
For the world is there a boss?
From here where shall we go?
Will we be able to know?
कुठून आलो आहोत आपण?
काय आहे वास्तवाचे खरेपण?
कोण आहे ह्या विश्वाचा कर्ता
कोण आहे जगन्नियन्ता ?
येथून जाणार कोठे आहोत आपण शेवटी
कळेल का ह्यातील काहीतरी माहिती
93 A 19
Is time the cause of the universe?
Or is it uncaused mess?
Is the world an accident?
Is there any other precedent?
Only a Conscious Being is
the cause
There is no other pause
काळच आहे का ह्या जगाचे निमित्त?
का सगळीच आहे अकारण गंतागुंत ?
का हा सगळाच आहे निव्वळ अपघात?
का आहे कुठला अजून एखादा सिद्धांत?
विवेकाचे भान हेच आहे सत्य
नाहीतर ह्या चर्चेला नाहीच
नाहीच विरामचिन्ह
93
A 20
By churning curd, you get butter
By digging well you get water
Fire is generated by friction
Knowledge gives bliss in a fraction
घुसळता दही, हाती येते नवनीत
खणता विहीर, मिळते मधुर नीर
अग्नी होतो निमार्ण, घर्षणातून काही अवधीत
ज्ञानामुळेच परमानंद, होतो विनाविलंब तुमच्या आधीन
93
A 21
A yogi is as bright as lamp
He is alone in the camp
He is beyond pleasure and pain
He is not interested in loss or gain
दिव्यासारखाच असतो योगी स्वयंप्रकाशी
तेवत राहतो परिसरात, तो एकटाच निश्चयी
सुख-दुःखाच्या पलिकडे तो, असतो नुसता साक्षी
नसतेच त्याला स्वारस्य, होवो लाभ अथवा हानी
93
A 22
The Atman moves, It moves not
It is far off, yet is very near
And by all it is sought
The one and all, it is very dear.
आत्मा असतो चल, आत्मा असतो निश्चल
तो असतो सर्वदूर, तरीही अत्यंत जवळ
नाही कधीच संपत आत्म्याचा त्या शोध
सर्वांनाच वाटतो तो अत्यंत अमूल्य जिवलग
93
A 23
I am Existence-Consciousness-Bliss
Strangely, Bliss I have to miss
Shadow of Bliss is on my mind
Great joy the mind does find
In return I have to undergo misery
Everyone is in hurry
Thus you will find
The mind is in bind
The mind is in a bind
There is terrible confusion
Philosophers say, "It is mutual superimposition."
मी आहे अस्तित्त्व, विवेक आणि सुखाचा समागम
पण काय आश्चर्य! कसं काय हरवून जात सुख अचानक?
सुख नव्हतच ते; ती तर नुसती सुखाची सावली
त्यालाच सुख सुख समजत मनाला चढली धुंदी
बदल्यात त्याच्या भोगत होतो अपार दुःखांच्या राशी
कोणाला आहे वेळ? आहे प्रत्येकालाच येथे फार घाई
म्हणूनच येईल येथे दिसून तुम्हास
हे मन आहे नित्य द्विधा स्थितीस
आहे फक्त प्रचंड घुसमट आणि विचारांची गोंधळगर्दी
तत्त्वज्ञानी म्हणतात, ``झाली आहे सरमिसळ ह्या सा र्याची.''
93
A 24
Brahman is accepted by many Sufi
But it is not part of philosophy
Cause of universe is unknown
The effect namely the universe is known
Different from both, cause and effect
Is Brahman the perfect?
केल आहे मान्य ब्रह्म काही संतांनी सुफी
पण नाहीच ते कुठल्या तत्त्वज्ञानाचा भाग तरीही
अज्ञात आहे कारण ह्या विश्वाच्या उत्पत्तीचे
पण दिसत आहे परिणामस्वरूप विश्व हे झालेले
असेल का ते ब्रह्म परिपूर्ण जे आहे कार्य-कारण भावाहून वेगळे ?
93
A 25
Unable are philosophers to define
Definition or not, we are not fine
Superimposition causes us misery
Also we are in a terrible hurry
व्याख्या करता करता टेकले हात तत्त्ववेत्यांनी
व्याख्या असो वा नसो घेरले आहे आम्हास अस्वस्थतेनी
हैराण आहे मन विचारांच्या ह्या सरमिसळीनी
आणि झाली आहे आम्हास कसली ही प्रचंड घाई
93
A 26
Superimposition is nescience
Confusion is its essence
Superimposition of Atman and world is there
O philosopher beware
Their separation is our duty
Otherwise, in life there is no beauty
विचारांची सरमिसळ म्हणजे ज्ञानाला विराम
द्विधा हे एकच त्याचे फलित; नाहीच ज्यात राम
आभासित झाले आहे विश्व ह्या आत्म्यावर
हे तत्त्ववेत्यांनो सावध !
ह्या आभासाचं खंडण हाच आपला प्रण
नाहीतर वैराण आहे आपले जीवन.
93
A 27
My identification is with body and mind
Spiritual knowledge I do not find
The mind is foolish like an elephant
It is deceived by an ordinary merchant
This identification has made me sad
The condition of mind is very bad.
माझं शरीर, माझं मन हेच माझं ओळखपत्र
त्याच्यामधे येतच कुठे हे अध्यात्मशास्त्र?
मन म्हणजे जणु मत्त वेडा हत्ती
`खेड्यात' फसवून व्यापारी त्याला; पोचवतो फार क्षति
माझं ओळखपत्रच देतं असा, अचानक मला दगा
मनाचा होत असतो नुसता त्रागा त्रागा.
(खेडा - जंगलात हत्तीला पकडण्यासाठी केलेला खड्डा. वर गवत टाकून ती
जमिनच आहे असा आभास केला जातो.)
93
A 28
Brahman is the Absolute One
From him universe is born
In the world men sing and dance
Trapped by Maya are they at once
Dissolved is the world in Brahman
Narrator of the story, there is none.
ब्रह्म आहे निरपवाद परिपूर्ण
त्याच्यातूनच निर्माण होतं हे विश्व पूर्ण
मौज-मजा आनंदात मग्न असतात लोक केवळ
सापडतात मायेच्या जाळ्यात, अचानक येऊन भोवळ
ब्रह्मामधे जातं विरून, सारं सारं उभं जग
नसतोच अस्तित्तवात कुठेही, कथेचा ह्या निवेदक
93
A 29
Brahman the Absolute is real
Passing show of the world is unreal
Real is the soul in identity with Brahman
Trying to be different, it becomes a phantom
परिपूर्ण ब्रह्म हेच आहे एक सत्य
दृश्यमान जगाचा भास आहे केवळ असत्य
घटाकाश आणि आकाशासारख असतं आत्मा
आणि ब्रह्माचं नातं
जसं अग्नी आणि ठिणगीमधे असतं एकच अग्नीतत्त्व
शोध दुस र्या
मार्गाचा आहे निव्वळ फसगत
स्वप्नातील दुनियेचा शोध असतो जसा बनावट
(निळ्या अक्षरातील शब्द मूळ
कवितेबाहेरील आहेत. समजण्यासाठी वापरले आहेत.)
93
A 30
AUM the word is this entire universe
Past, present, future is, indeed, AUM
And whatever else there is diverse
Beyond time and space is verily AUM
ॐ (अ उ म) ह्या शब्दानेच भरून राहिले आहे सारे विश्व
ॐ म्हणजेच सारे भूत, वर्तमान, भविष्य
जे जे काय आहे वैविध्यपूर्ण, किंवा ते अज्ञात
काळ आणि ह्या पोकळीच्याही पलिकडलं
खरोखरच ते सारं सारं आहे, ह्या ॐ मधेच सामावलेलं
93
A 31
He [Brahman] is the Lord of all
He is the knower of all
He is the source of all
Finally, in to him all beings fall
ब्रह्मच आहे सा र्या त्रैलोक्याचा स्वामी
तेच आहे एकमेव सर्वज्ञानी
तेच आहे सगळ्याचे उगमस्थान
शेवटी त्याच्यामधेच जात सारं सारं त्रैलोक्यही जिरून /सामावून
93
A 32
Walks without leg, grasps without hand
He sees without eyes, He hears without ears
He knows, but him no one does understand
He is supreme Person, according to great seers.
त्याला गती आहे पण पाय नाही; पकड आहे पण हात नाही
नेत्र नसूनही तो सर्वदर्शी; कान नसूनही तो सर्वस्पर्शी
तो आहे सर्वज्ञानी; परी न जाणे त्यास कोणी
तो आहे परमपुरुष परमात्मा असे म्हणतात द्रष्टे ज्ञानी
93
A 33
He is the Ear of ear, The Mind of the mind
The Speech of the speech, you will find
He is the Eye of the eye, the Life of the life
Having detachment, realize Him without strife
तो आहे कानांचेही कान; मनाचेही मन
तो आहे वाचेचीही वाचा, समजेल बघता शोधून
तो आहे नेत्रांचेही नेत्र आणि जीवनाचेही जीवन
कुठल्याही संघर्षाविना, उमजेल तो वैराग्यातून
93
A 34
Eye does not go thither, nor speech, nor mind
We do not know Him, we do not find
He is different from known, above the unknown
Thus we have heard from the teachers who have grown.
नेत्रांनी नाही येत तो बघता, शब्दांनी नाही येत तो सांगता
आहे तो गात्रांनाही अगोचर; मनाने नाही येत तो जाणता
ओळखतही नाही आपण त्याला; माहीत नाही आपल्याला त्याचा पत्ता
आहे तो सर्व जाणीवांच्या पलिकडे; पार ह्या अज्ञाताच्या
तेच सद्गुरूच देऊ शकतात त्याचे ज्ञान
ज्यांना झाले आहे त्याचे पूर्ण ज्ञान
93
A 35
His form is not an object of vision
No one beholds Him with the eye
He is revealed by constant meditation
Those who know this need not sigh
त्याचे स्वरूप नाहीच होऊ शकत दृष्टीचा विषय
नाही निरखता येत त्याला डोळ्यांनी निरामय
नित्य मनन, चिंतन, ध्यानातूनच उलगडते त्याचे स्वरूप
झालं आहे ज्यांना हे आकलन, त्यांना दुःखही वाटत नाही कुरूप
93
A 36
AUM is the bow
Atman is the arrow
Brahman is the mark
The arrow has to hit it with spark
ॐ आहे धनुष्य
आत्मा हा बाण
ब्रह्म आहे लक्ष्य
तेजाच्या स्फुलिंगासहित घुसला पाहिजे नेमका लक्ष्यात बाण
93
A 37
The absolute Being is whole
Whole is this visible bowl
From the absolute comes forth this mundane whole
Yet that Supreme Being is the Whole
ते परिपूर्ण ब्रह्मच असतं विश्वव्यापक संपूर्ण
परिपूर्ण आहे हा ब्रह्मांडाचा दृश्य हंडा संपूर्ण
त्या परिपूर्णातूनच साकारतो हा संसार संपूर्ण
तरीही उरते ते अद्वितीय (ब्रह्म) संपूर्ण.
93
A 38
The Absolute motionless One is swifter than mind
The senses can never overtake Him, you find
He is faster than those who can run
Because Him is our existence and fun.
जरी निश्चल असले ब्रह्म, तरी पोचते मनाच्या वेगाच्याही आधी
नाही येत गात्रांच्याही ते कचाट्यात कधी
सर्व गतिमानांपेक्षाही त्याची अधिक आहे गती
आहे त्याच्यामुळेच जीवनाला अस्तित्त्व आणि त्यात गमतीजमती
93
A 39
He moves and He moves not
He is far and He is also near
He is within and He is without
In Him there is no fear.
ते आहे चल आणि ते आहे स्थाणू
ते आहे अगम्य तर ते आहे अत्यंत समीप
ते आहे हृदयस्थ आणि ते आहे निरालंब
नाही त्याच्यात भीतीचा लवलेश एक थेंब.
93
A 40
The absolute is called Brahman
Soul is known as Atman
If the Soul identical with Brahman
Then Atman and Brahman become one
This is the Advaita philosopher's declaration
You can accept this, but there is no compulsion.
म्हणतात ब्रह्म त्या विश्वरूप परिपूर्णाला
आणि आत्मा त्या चैतन्याला
जशा ठिणग्या नाहीच अग्नीपासून
वेगळ्या
आणि लाटा एकाच जलाच्या जरी
दिसती वेगवेगळ्या
तसे एकच असले जर आत्मा आणि ब्रह्म
तर एकरूपच आहेत हे आत्मा आणि ब्रह्म
हेच सांगते अद्वैत मताचे तत्त्वज्ञान
नाहीच कुठली सक्ती; तुम्ही करा त्याला मान्य अथवा अमान्य
(निळ्या अक्षरातील मजकूर मूळ
पद्यातील नसला तरी त्याची पुष्टी करण्यासाठी वापरला आहे.)
94
Leaving Maya with all her modification
Towering above the delusion of creation
Sweeping away all ideas of pleasure and pain
Glorious is Eternal Absolute, Brahman's domain
सोडून मागेच हे माया आणि मायाजाल
संसाररूपी मृगजळातूनही उठून उंच वर वर
दूर सारून सुख-दुःखाच्या भ्रामक कल्पना
राहते निरंकुश सत्ता सर्वांच्याही वर ब्रह्म्याचीच सर्वदा
/ किंवा
सोडवून गुंता ह्या माया आणि मायाजालाचा
निरास करून भ्रांतीत टाकणा र्या ह्या संसाररूपी मृगजळाचा
नाश करून सुख-दुःखाच्या भ्रामक कल्पनांचा
राहते निरंकुश सत्ता सर्वांच्याही वर ब्रह्म्याचीच सर्वदा
94
A 1
All this phenomenal world is Brahman
This individual self also is Brahman
Four are the states of this Jiva
Waking, dream, deep sleep and Turiya
प्रत्ययास येणारे हे जग म्हणजेच आहे ब्रह्म
येथील प्रत्येक जीवही आहे ब्रह्म
आहेत चार अवस्था जीवाच्या
जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तूर्या
94
A 2
When you are awake
Through the sense-organs you enjoy the world
Organs and limbs, human body they make
In this cage, the Jiva is curled.
असता ह्या देहास जागृती
ज्ञानेंद्रियांमार्फत मिळते तुम्हाला ह्या जगाची अनुभूती
सारे अवयव आणि हातपाय बनवितात एक
मानवी काया
त्याच देहाच्या पिंज र्यात जीव आहे कोंडलेला.
94
A 3
Your dreams are sweet
In the mental plane, friends you meet
But the organs do not act
This is a hard fact
तुमची स्वप्न असतात गोड गुलाबी
मनाच्या ह्या अवस्थेत भेटतात दोस्त-मंडळी
पण अवयव नाहीच करत काही हालचाल
हीच आहे खरी वस्तुस्थिती
94
A 4
When you are in deep sleep
In the mind, there is neither desire nor any dream.
Being happy, you do not weep;
Of experiences, it is the cream.
As you wake up, you suffer again
There is no other bargain
असता तुम्ही गाढ निद्रेत जेंव्हा
उठत नाहीत मनात संकल्प आणि वासना तेंव्हा
आनंदाच्या ह्या महासागरात नसते आसवांची संकल्पना
हेच आहे अनुभवांचे सार /सत्त्व सा र्या
येता जागृती संकटांची खैरात करते सारा वांधा
नसतोच दुसरा कुठला चांगला सौदा.
94
A 5
The forth state is Turya;
It is state of bliss for Jiva.
Jiva is the one with the Supreme Absolute;
Many a problem is eradicated with its root.
चौथी अवस्था तुर्या आहे खास
होतो येथे आत्मानंदाचा लाभ जीवास
पडते येथे जिवा शिवाची गाठ
मूळापासूनच समस्यांची सुटते पाठ
94
A 6
The reality is that same Eternal Atman
Ever blessed, Ever pure and Ever Perfect One
In the saint and in sinner it is the Soul
It is the shining One, the Goal
संत, सज्जनांच्या आणि दुर्जनांच्याही हृदयात
एकच भरून राहिले आहे, ते ब्रह्म अनादि अनंत
नित्य मंगल, नित्य शुद्ध , परिपूर्ण ब्रह्म निरंतर
हेच आहे एकमेव सत्य चिरंतन
ते ब्रह्म तेजस्वी, तेजोमय, स्वयंप्रकाशी, प्रकाशमान
तेच आहे आमच्या जीवनाचे एकमात्र ध्येय, उद्देश, प्रयोजन
94
A 7
आवडते तुम्हाला दुनिया स्वप्नांची
पण असते ती मिथ्या, नुसतीच आभासाची
असतात त्यातील विषय मानवी चौकटीत बसणारे
अगदिच क्षुद्र किंवा भ्रमाचे भोपळे फुगलेले
94
A 8
स्वप्नात करत असतो आपण काहीतरी कृती
पण ख र्या
खोट्याची करताच येत नाही तपासणी
दिसते एक सुंदरशी चित्रनगरी पुढ्यात
पण हाय! अदृश्यही होऊन जाते एका क्षणात
94
A 9
नसतं अस्तित्त्व ह्या स्वप्नांच्या दुनियेतील गोष्टींना
सांगतात असे ठामपणे पवित्र शास्त्रे सगळ्यांना
झालं आहे हे सिद्ध सप्रमाण
शमल्या आहेत शंका; झालं आहे
समाधान
94
A 10
Objects are seen in the waking state
We want to know their fate
Illusory are they, O seer
We declare without any fear
दिसत असतात वस्तू आपण जागे
असतांना
काय आहे भविष्यात त्यांच्या; मनात असते उत्सुकता
अरे देवा! भासच आहेत सारे, त्या आहेत फसव्या
म्हणतो बेधडकपणे आपण जराही न घाबरता
94
A 11
Non-existence at the beginning and in the end
Fate of the object is seen in a dream, O friend
Similarly are things seen with your eyes
You should not rely upon all those guys
जीवनाच्या आधी आणि जीवनांच्या नंतर नसतच जीवाचं अस्तित्त्व
मित्रांनो, मधे दिसतं जे जीवन ते फक्त एक स्प्नवत्
त्याचप्रमाणे जे जे असतं गोचर ह्या नेत्रांना
लक्षात घ्या हे, नसत विश्वासार्ह ते, त्याच्यावर अवलंबून राहतांना
94
A 12
शेवटी काहीच नाही साधत ह्या स्वप्नातून
शेवटी स्वप्न ती स्वप्नच फक्त अफलातून
जागं होण्यानेही नाही साधत काही उद्देश
जणु तोही असतो एक स्वप्न-संदेश
94
A 13
सतत तयार होत असतात मनात अनेकोअनेक कल्पना
हे जग! हीही एक कल्पना होते जाणीव आत्म्याला
पाहू शकतं हे मन स्वप्नात
गोष्टी कितीक नव्या आणि कितीक स्थळे अज्ञात
94
A 14
First the soul imagines a bound state
He accepts it as his fate
Many are the pleasant and unpleasant things
The bound soul helplessly sings
प्रथम आत्मा करतो कल्पना एका बंधनात अडकल्याची
आणि नशीब म्हणून करतो मान्य तेच स्वतःशी
असतात अनेक सुखद आणि दुःखद गोष्टी
तो बंदी आत्मा गात राहतो
94
A 15
Atman is similar to Absolute space
Jiva is like the space inside the pot
Destroyed is the pot, space merges in to space
Blessed Jiva gets merged in the Absolute
आत्मा म्हणजे जणु हे असीम आकाश
आणि जीव म्हणजे जणु एखाद्या घटातील आकाश, घटाकाश
टाकता फोडून घट; घटाकाश विलीन होते आकाशात
तसाच हा जीव विलीन होतो ब्रह्म्यात
94
A 16
असीम अपार आहे विस्तार ह्या ब्रह्माचा
अजन्मा, सनातन अविकारी हेच आहे त्याचे रूप सदा
अवतरते भूतलावर ते मानव रूपात
जरी भरून राहिले आहे ते सर्वत्र चराचरात
94
A 17
म्हणतात मुलं सहज आकाशाचा रंग निळा
पण माहित नसत त्यांना त्याच कारण कित्येकवेळा
पोकळीला कुठला रंग? पांढरा किंवा निळा
रंगहीन असते ती; तिचा रंग ना पांढरा ना निळा
94
A 18
Eternal I am, Thus think myself;
Even then I want to increase my pleasure
Being reflection of supreme self,
My enjoyment, I cannot expand even by a measure
`मी आहे शाश्वत अनादि अनंत' असा विचार करतो मीच माझ्याशी
तरीही करत असतो इच्छा अजुन अजुन
सुखोपभोगाची
पण मी तर आहे ब्रह्माचं जीवात पडलेल फक्त प्रतिबिंब
मग नको एका काडीचाही हव्यास
हो निःसंग
मग कशास हवा एका काडीचाही हव्यास
मग कशास हवा हा वृथा हव्यास
गडगंज
94
A 19
Engrossed in the world is Jiva
He does not know that he is Shiva
Ignorant that he is, denies the existence of Brahman
Indeed Jiva is under utter confusion.
ह्या असार संसारात होतो लिप्त हा जीव
मग कळतच नाही त्याला की तोच आहे शिव
अज्ञानाने अमान्य करतो तो ब्रह्माचेच अस्तित्त्व
खरच त्यानेच होतो जीव द्विधा आणि गोंधळून जातो नित्य.
94
A 20
Brahman is the eternal substreatum,
On it is the shadow, appearing to have momentum,
Unaffected is the screen by shadow,
Unreal are the hill and meadow.
ब्रह्म म्हणजे आहे एक अनंत असीम पडदा
पडतात त्याच्यावर सावल्या आणि होतो भास गतीचा
होत नाही प्रभाव पडद्यावर सावल्यांचा
भासात्मकच असतात हिरवीगार कुरणे, टेकड्या
94
A 21
लाभते गाढ निद्रेत शांती आणि सौख्य
काहीच नको असतं जीवाला तो असो तृप्त
ह्या तृप्तीच्या आवरणातूनच मिळत राहतं सौख्य
आपला मित्र जीव होतो सुखी आणि जमा करत राहतो सौख्य
94
A 22
स्वप्नामधे दिसत असतात समुद्र, टेकड्या
जाग येताच नसतेच ह्यातील काही समोर
उमगलच नसतं त्याला ब्रह्म सनातन
94
A 23
वाळवंटात होतो फक्त आभास नसलेल्या पाण्याचा
ते असतं मृगजळ आभासाचं लाटांच्या
तशीच असतात सारी नाती वडिल, भाऊ इत्यादि
देतील का ते तुम्हाला साथ तुम्ही गेल्यावरही/ तुमच्या मरणानंतरही?
94
A 24
चांगली किंवा वाईट, दोन असतात बाजू ह्या मायेच्या/ प्रकृतीच्या
जखडून टाकते माया, करते गुलाम आपल्याला
हा असला वाईट पैलू तरी चांगला माहितच नसतो आपल्याला
मनाची कोंडी आणि द्विधा सुटतच नाही अंतापर्यंत आपल्याला
94
A 25
Brahman Himself is the individual soul
Being the Absolute, he is real
When there is some other goal
Confused is jiva, that is what we feel
आत्मा आणि परमात्मा ह्यात भेद नाही काही
आहे तो परिपूर्ण अनंत आणि अनादि
आत्म्यावरून ढळते लक्ष्य आणि बदलते जेंव्हा साध्य
वाटते भांबावून जातो जीव आणि जातो भरकटत
94
A 26
Made of flesh, blood and bone
The gross-body, to everyone known
Complex of sense-organs, vital-force and mind
As subtle body, the Jiva it does bind
रक्त, मांस, अस्थी ह्यांचा हा स्थूलदेह
ज्ञानेंद्रिये, प्राण, मन असा हा सूक्ष्म देह
ह्या दोघांच्याही संगतीने
हा जीव आहे बद्ध
94 A 27
Jiv is busy with action-good or bad
With the result, he may happy or sad.
In the psyche, embedded is the result of action
Not known to him, within a fraction
It causes another body for the soul
Even though it has no shape at all
Thus, causal body is its name
Not being body is its name
Not being a body, all the same.
चांगल्या-वाईट कामांमध्ये जीव असतो गुंतलेला
त्याचाच परिपाक म्हणून सुखदुःखात बुडालेला
खोल खोल अंतरंगात नकळत त्याच्या
क्षणात एका रुततो परिणामाचा काटा
94
A 28
The Absolute, Existence-Consciousness- Bliss is He
The Supreme Being is realized in Samadhi
Maya or Prakrti is his inscrutable Power
Infinite are names She does shower
Indeed She appears in many forms
She is not subject to your norms
तो उरला एक निरपवाद शुद्ध परिपूर्ण ब्रह्मरूप अस्तित्व
घेतली त्या परम ब्रह्माची अनुभूती त्याने समाधि अवस्थेत
माया अथवा प्रकृती आहे त्याची गूढ अगम्य शक्ती
अगणित आहेत नावे तिची घ्यावी
तितकी कमी
करते माया धारण स्वतः रूपे अनंत कोटी
लागू नाही तिला कोठची तुमची नियमावली
94
A 29
Action has its result, may be good or bad
You may be happy or sad
The time always appearing as Day and Night
It my be dark or bright, black or white
चांगली वा वाईट, असते प्रत्येक कृतीची काही निष्पत्ती
ती करते तुम्हाला आनंदी अथवा दुःखी
जसा काळ धावत असता पुढे; होते दिवस अथवा रात्री
जी असते गर्द अंधारी अथवा प्रकाशमयी ,काजळ काळी किंवा उजळ पांढरी
94
A 30
Jiva when in deep sleep
Bitter harvest he does not reap
Any company he does not keep
Though helpless, he does not weep
गाढ गाढ निद्रेत असतो जेंव्हा जीव
घेत नाही तो कडू विचारांचं पीक
नाही ठेवत तो कोणाशीच जवळीक
वाटला जरी असहाय्य, तरी लागण होत नाही त्याला दुःखाची कधीच
94
A 31
In dream he is in a fashionable company
Him, Kings and soldiers accompany
He gets opportunity to laugh
He is looking at a map
It is nothing but a dream
In it there is no cream
स्वप्नावस्थेत तो असतो कुठल्याशा लोकप्रिय संगतीत
साथ देतात त्याला राजे रजवाडे आणि त्यांचे मंत्री संत्री
मिळते त्याला स्वप्नात हसायचीही संधी
उघडून बघतो तो जेंव्हा नकाशाची गुंडाळी
असतं ते स्वप्न, उरत नाहीच
काही
नसतच त्याच्यात काही तथ्य, असार सारं काही
94
A 32
In dream objects are created by mind
Illumined by its own light, it does find
Thereafter it may enjoy a deep sleep
Or it may wake up and weep.
मनाचीच कल्पनाशक्ती उभारते स्वप्नांची दुनिया
मनाचाच प्रकाश उजळतो स्वप्नातल्या
गावा
नशीबी येते त्यानंतर कधी गाढ गाढ निद्रा
जर आली जाग चुकून तर स्वप्नभंगाचा त्रागा
94
A 33
There is a state of deep deep sleep
In it, the jive need not weep
In it, a father is no more a father
For his family, he need not gather
In it, he does not think
There is no possibility to sink.
असते एक अवस्था प्रगाढ निद्रेची
नसते तेथे जीवास भीती दुःख आणि अश्रूंची
माता, पिता, बंधू --- गळून पडतात नाती
गळून जाते त्याच्यावरील परिवाराची जबाबदारी
उठत नाहीत मनात विचारांचे तरंग
बुडण्याचीही नसते भीती; तो असतो निःसंग
94
A 34
Form is perceived, eye is the perceiver
Mind is the perceiver, eye is perceived
Mental modifications perceived, Atman the perceiver
The same Atman has remained unperceived
आकृती असते दृश्य नेत्र असतो द्रष्टा
मन असतं द्रष्टा तेंव्हा नेत्र असतात दृश्य
मनातील बदल असतात दृश्य आणि आत्मा असतो द्रष्टा
त्याच आत्म्याचे अवलोकन करणारा सापडत नाही द्रष्टा
95
Dissolved are knowledge, knower and known
In that Absolute Eternal Consciousness One
Love, lover and beloved merge in that supreme Ocean
Birth, growth and deth vanish in that Infinite One.
विलीन होते ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेयाची त्रिपुटी
उरतच नाही प्रेम, प्रेमी आणि
प्रियकर ही नाती
त्या निरंतर शाश्वत ब्रह्ममय सागरात
लोप होतात जन्म, मृत्यू, वाढ ह्या तिन्ही स्थिती
96
Totapuri is a liberated soul
He has attained the Supreme Goal
Like a lion, he romes at will
His story, who is there to tell?
तोतापुरी आहे एक जीवनमुक्तात्मा
`सोऽहं' हे अंतिम सत्य गवसलं आहे त्याला
सिंहासारखा निर्भयपणे फिरत असतो तो एकटा
पण कोण सांगू शकेल त्याची सारी कथा?
97
On his way to Dakshineshwar he stops
In to Ramkrishna's room he peers
Totapuri, a man of knowledge
has Ramkrishna in his tutelage
मार्गात त्याच्या दक्षिणेश्वरी थांबला तो एकदा
रामकृष्णाच्या खोलीत डोकावला सहज जाता जाता
तोतापुरी होता ब्रह्मज्ञानाचा ज्ञाता
घेतले त्याने रामकृष्णाचे पालकत्व आता
98
In Ramkrishna he finds a true seeker
Whose brightness shows that he has no fear
Totapuri puts forth his praposal
But, Ramkrishna is at the Mother's disposal
पाहिली त्याने रामकृष्णात एक तीव्र इच्छाशक्ती
त्याचे तेजच सांगत होते, नाही माहित त्याला भीती
ठेवला रामकृष्णापुढे एक तोतापुरीने प्रस्ताव
पण रामकृष्णाचा होता मातेचरणी समर्पित भाव
99
In a state of trance, he heard Her mandate
On Absolute Brahman Ramkrishna should meditate
As he has the Divine Mother's permission
To Totapuri's dictates is his submission.
ऐकला समाधीअवस्थेत त्याने मातेचा आवाज,
`त्या अनादि अनंत ब्रह्माचा घ्यावा तू ध्यास'
मिळता कालीमातेचा असा त्याला आदेश
शरण गेला तोतापुरीस रामकृष्ण होण्या सफल उद्देश.
100
To practice the Vedantic discipline
Ramkrishna is to become a sanyasin
At Dakshineshwar, his Mother stays
Holy Ganga is in her gaze
करण्यासाठी वेदान्तविद्येचे नियम पालन
करावे लागणार होते रामकृष्णाला सन्यासाचे आचरण
दक्षिणेश्वरी त्याची जननी परम पवित्र गंगा माता
होती करत आपल्या पुत्राचे अवलोकन आता
101
How can the son shave off his head ?
Throw away his sacred thread ?
It is too much for a mother to see
Even though the son would be free.
कसे करावे माझ्या प्रिय पुत्राने डोक्याचे मुंडण?
कसे त्यागावे जनेयु ? धागा जो नाही साधारण?
असह्य होते मातेसाठी सारे हे अवलोकन
जरी होता मुक्तीच्या पथावर तिचा लाडका रामकृष्ण
102
Preparations are made for him to renounce
The night is calm, all around it is silence
Before dawn, in the placid silence
The world, Ramkrishna does renounce.
चालू होती तयारी त्याच्या सन्यासदीक्षेच्या समारंभाची
नीरव होती रात्र, चोहीकडे शांतता पसरलेली
साधून असा ब्रह्ममुहुर्त, सुशांत पहाटेपूर्वी
घेणार होते रामकृष्ण दीक्षा सन्यासाची
103
In the sacred fire, he puts oblations swift
He burns the sacred thread and tuft
Accepts the loin cloth and the ochre robe
A glorious day for India and globe.
केले न कचरता सहजपणे त्याने हवन पवित्र अग्नीत
केली अर्पण त्यात शेंडी आणि जाळून टाकले यज्ञोपवीत
केले धारण सन्याशाचे कशाय वस्त्र सहजी
तोच होता सुवर्णदिन भारतासाठी आणि जगासाठीही
104
Vedant finds a new glorious apostle
On the valley of religion, grand castle
A bridge between East and West
All religious bickering will be at rest.
लाभला वेदान्ताला एक नवीन लखलखता प्रेषित
105
Thou art one with ever-free-Brahman
Beyond the limits of time, space and causation
Pierce through maze of name form
Be free, rush out of it like a lion
आहे एकच तू आणि ते निरालंब ब्रह्म अनादि अनंत,
ओलांडून जातं ते काळ, आकाश आणि विचारांच्या सीमांपलिकडे नितांत
जा भेदून ह्या नवारूपाच्या बाह्य आकारांच्या गुंत्यातून पार
हो जीवनमुक्त, विचर केसरीसमान निर्भयपणे आपल्याच धुंदीत मग्न
106
Totapuri asks him to fix his mind
On Absolute Brahman
beyond name and form
The Blissful Mother alone fills his mind
Before him appears Her divine form
तोतापुरीने सांगितले, `ज्याला नाही नाम रूप आकार रंग
अशा अनादि अनंत ब्रह्मावर कर तुझे मन एकाग्र'
पण होती व्यापून राहीली त्याचे मन ती आनंदमयी जननी
आणि तिचीच दैवी प्रतिमा राहे त्याच्यापुढे सदोदित उभी
107
With stern determination
He again sits for meditation
The form of the divine Mother
With the sword of discrimination, he does sever
करून परत निश्चय कठोर
बसला तो ध्यानास घोर
आणि तीच ती मनःपटलावरील दैवी प्रतिमा कालीमातेची
केली नामशेष अद्वैताच्या लखलखत्या खड्ग-पात्याने थोर
108
At Once, the mind soars beyond the relative plane
Lo, in Samadhi he merges himself soon
Beyond nae and form,
speech and thought
Ramkrishna relizes Absolute.
विचारांच्याही पातळीवरूनही खूप खूप उंच
मन घेत असे जेंव्हा भरारी नभस्पर्शी उंच उंच
तद्रूप होऊन जात रामकृष्ण समाधीत शांत
नाव, आकृती, वाचा, विचार, सर्वांना भेदून पलिकडे
त्या सनातन निरामय ब्रह्मात विलीन होऊन जात निभ्रांत
109
In Nirvikalp-Samadhi, Shri Ramkrishna is
The countenance is calm, serene and full of peace
Totapuri is breathless with wonder
Seeing the miracle, he is unable to ponder.
जाता निर्विकल्प-समाधीमधे श्री रामकृष्ण
चर्या असे त्यांची प्रसन्न, घनगंभीर, नित्य तृप्त
तोतापुरीही व्हायचे आश्चर्याने थक्क
पाहून हा चमत्कार, कुंठीत त्यांच्या विचारांची गति समस्त
----------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment